Table of Content
About Corn Usal Recipe
कॉर्न प्रेमी असलेल्या सर्व नवीन मातांसाठी ही कृती. जेव्हा तळलेले कॉर्न आणि सँडविच गरोदरपणाच्या शेवटच्या काही आठवड्यात किंवा प्रसूतीनंतर पचायला जड होतात तेव्हा... तुम्ही ही निरोगी आणि हलकी कॉर्न रेसिपी वापरून पाहू शकता.
साहित्य :
- व्हाईट कॉर्नचे दाणे – १ कप
- ताजा खोवलेला नारळ – २ टेस्पून
- कोकमाचे तुकडे – २ लहान
- गूळ/साखर – १ टेस्पून
- कोथिंबीर
- मीठ
- फोडणीसाठी : २ टीस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, १ चिमटी हिंग, १/४ टीस्पून हळद, १/२ टीस्पून लाल तिखट
कृती :
- कॉर्न प्रेशर कुकरमध्ये २ ते ३ शिट्ट्या करून शिजवून घ्यावे. शिजवताना १/४ टीस्पून मीठ घालावे.
- कढईत २ टीस्पून तेल गरम करावे. त्यात मोहोरी, हिंग, हळद, लाल तिखट आणि नारळ घालावा. काही सेकंद परतावे.
- शिजलेले कॉर्न घालावे. थोडे पाणी आणि कोकम घालावे. चव पाहून लागल्यास मीठ घालावे. झाकण ठेवून ५ मिनिटे मंद आचेवर शिजू द्यावे.
- गूळ घालून २ मिनिटे उकळी काढावी. हि उसळ पोळीबरोबर छान लागते.
टिप :
- व्हाईट कॉर्न चवीला गोड नसतात. त्यामुळे साखर किंवा गूळ घालावा. तसेच कॉर्न कोवळे असतील तर कुकरची एकच शिट्टी करून कॉर्न शिजवावे.
Tags:
Marathi